मंगळवार, सप्टेंबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिलासा! खडकवासला धरण आणि नीरा कालव्यातून आवर्तन देण्याबाबत झाला हा निर्णय

by Gautam Sancheti
मार्च 26, 2022 | 8:09 pm
in राज्य
0
Ajit pawar 2104 640x375 1

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खडकवासला धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करुन नवा मुठा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. पुणे शहरातही महानगरपालिकेने पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सर्वत्र समान पाणी मिळेल, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
खडकवासला प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार सर्वश्री अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.

खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा २.५ टीएमसी पाणी कमी आहे, अशी माहिती बैठकीत यावेळी देण्यात आली. त्यावर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जलसंपदा, महानगरपालिका प्रशासनाने पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी, परंतु सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे. पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे.
श्री. पवार म्हणाले, भामा आसखेड प्रकल्पाचे पुणे शहरासाठी निश्चित केलेल्या पाण्यापैकी दैनंदिन सुमारे ७५ एमएलडी पाणी उचलले जात नाही. ते पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी पाईपलाईन, पंपिंग स्टेशन आदी कामे गतीने पूर्ण करावीत, जेणेकरुन खडकवासला प्रकल्पावरील तेवढा ताण कमी होईल. महानगरपालिकेने १०० टक्के पाणी मीटर बसवणे, बेकायदेशीर नळजोड तोडण्यासह त्यावर कठोर कारवाई करणे यावर विशेष भर द्यावा. दक्षिण तसेच पूर्व पुणे भागात पाण्याच्या अडचणींबाबतच्या तक्रारी सोडवण्यासाठी युद्धपातळीवर कामे हाती घ्यावीत तसेच सुरू असलेली कामे गतीने आणि चांगला दर्जा राखून पूर्ण करावीत. नवीन पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन आदी कामे हाती घेताना ही कामे तुकडे (पॅकेजेस) करुन केल्यास एकाच वेळी कामे सुरू होऊन लवकर पूर्ण होतील, असेही श्री. पवार म्हणाले.

आमदार चेतन तुपे यांनी खराडी ते साडेसतरा नळी पाईपलाईनद्वारे भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी उचलण्याचा पर्याय सुचवला. त्यावर याबाबत व्यवहार्यता, तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेला दिल्या. आमदार श्री. तापकीर यांच्या मागणीनुसार शहरात नवीन समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये अतिरिक्त पंप ठेवण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.
सध्या राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असून नुकतीच २४ हजार मेगावॅटपर्यंत गेली आहे. भविष्यातही ही मागणी वाढण्याची शक्यता असून अतिरिक्त वीज उपलब्ध करुन घेण्यासाठी एनटीपीसीकडून तसेच नॅशनल ग्रीडमधून वीज घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, भविष्यातही वीजेच्या समस्येला गृहीत धरुन पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असेही ते म्हणाले.

नीरा उजवा तसेच डाव्या कालव्यातून ३० जूनपर्यंत सलग दोन आवर्तने
नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरण प्रकल्पात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक असून ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसी पाणी अधिक आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यातून तसेच डाव्या कालव्यातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनाला जोडून अजून एक आर्वतन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्याची तसेच भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार सर्वश्री अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.

नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तसेच माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्राला मंजूर आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जाईल. तसेच पाऊस सुरु व्हायला उशीर झाल्यास ३० जूननंतरही पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली.
चासकमान प्रकल्पातूनही सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
पवना प्रकल्पातही गतवर्षीप्रमाणे समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पिंपरी- चिंचवड शहराला पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे, अशी माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीस नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, खडकवासला पाटबंधारे विभागाचे विजय पाटील, नीरा डावा कालव्याचे श्री. बोडके, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. गुंजाळ आदी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळेल एवढा जबरदस्त पगार

Next Post

नाशिक : मोटारसायकल चोरणा-या दोघांना पोलिसांनी केले गजाआड; तीन मोटारसायकली केल्या हस्तगत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

या योजनेच्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात येणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सप्टेंबर 15, 2025
Untitled 21
संमिश्र वार्ता

बीड पुरात भारतीय लष्करी दक्षिण कमांडच्या थार रॅप्टर्स विमानदलाची जलद बचाव मोहीम

सप्टेंबर 15, 2025
CM
संमिश्र वार्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा या तारखेपासून शुभारंभ….

सप्टेंबर 15, 2025
Untitled 20
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा…बघा, व्हिडिओ

सप्टेंबर 15, 2025
PETROL PUMP
संमिश्र वार्ता

टँकरमधून होणारी इंधन चोरी….पेट्रोल डीलर्स असोसिएशनने चोरीचा असा केला पर्दाफाश

सप्टेंबर 15, 2025
Untitled 19
स्थानिक बातम्या

नाशिकच्या केंब्रिज स्कूलमध्ये बॅाम्ब…शाळा प्रशासनाने दिली ही माहिती

सप्टेंबर 15, 2025
accident 11
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात भरधाव वाहनांनी दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

सप्टेंबर 15, 2025
SUPRIME COURT 1
महत्त्वाच्या बातम्या

वक्फ संशोधन कायद्याला आव्हान देणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

सप्टेंबर 15, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : मोटारसायकल चोरणा-या दोघांना पोलिसांनी केले गजाआड; तीन मोटारसायकली केल्या हस्तगत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011