पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती-पत्नीचे नाते हे अत्यंत विश्वासाचे असते. परंतु या नात्यांमध्ये संशय किंवा वाद निर्माण झाला तर त्यातून एखादी दुर्घटना देखील घडू शकते. शहरातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्री गाढ झोपेलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे,
नेमकं काय घडलं
गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील गुन्हेगारी मध्ये वाढ झालेली दिसून येते. त्यातच एक थरकाप उडवणारी ही घटना शिवणे परिसरात पहाटेच्या सुमारास घडली.साखर झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत पती गंभीरित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. महादेव जाधव (वय ३०, रा. शिवणे) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी संशयित महिलेविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हणून पत्नीने केले हे कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव जाधव यांनी पत्नीच्या भावाला काही रक्कम उधार दिली होती. पैशांची अडचण असल्याने त्यांनी मेहुण्याला पैसे परत करण्यास सांगितले. भावाला दिलेले उधार पैसे सतत मागत असल्यावरून पत्नीच्या मनात राग होता. या रागाच्या भरात पत्नीने गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर गरम उकळलेले पाणी टाकले. या घटनेत महादेव गंभीरित्या भाजले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात पत्नीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या इसमाच्या पत्नीने आपल्या पतीसोबत असे कृत्य का केले याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही.