पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पालखी सोहळ्याला यंदा गालबोट लागले आहे. आळंदी येथील पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये झालेला वाद आता चिघळण्याची चिन्हे आहेत. एकीकडे वारकऱ्यांना लाठीमार झाल्याचे सांगण्यात येत असताना दुसरीकडे पोलिसांना ढकलाढकली झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.
मागील शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. कोणतंही विघ्न न येता वारी पार पडली. कोरोनात दोन वर्ष वारीत खंड पडला. मात्र त्यानंतर वारी परंपरेनुसार आणि लाखो वारकऱ्यांच्या गजरात पंढरीला जाते. शेकडो वर्ष ही परंपरा अशीच सुरु आहे. मात्र या वर्षी पहिल्यांदाच वारीला गालबोट लागल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे.
काल या प्रकरणाचे तीन व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांकडून वारकऱ्यांंना लाठीमार केल्याचा दावा अनेकांनी केला होता. मात्र त्यानंतर आज पुन्हा याच प्रकरणाचा दुसरा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत मात्र प्रकरणाची दुसरी बाजू स्पष्ट होत आहे. मंदिरात प्रवेश मिळण्यावरुन वाद झाला होता. त्यामुळे वारकऱ्यांनीच पोलिसांना ढकलल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांच्या अंगावर पाय ठेवून वारकरी पुढे सरकत होते. त्यानंतर पोलीस आणि वारकरी आळंदीतील चौकात आले. त्यानंतरचे व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र पोलिसांनी लाठीमार केला नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
राजकीय वातावरणही तापले
वारकरी आणि पोलिसांमधील वादाचे परिणाम राजकीय क्षेत्रातही दिसून येत आहेत. या प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरू झाले आहे. शेकडो वर्षांत पहिल्यांदाच वारीत असा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याचं बोललं गेलं. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता.
मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला होता. पालखी प्रस्थानादरम्यान मानाच्या पालख्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंड्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र, ऐनवेळी या दिंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिंडीतील इतर वारकरी नाराज झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. याचवेळी पोलिसांमध्ये आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये वाद झाला होता.
Pune Varkari Lathicharge video viral