नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिलेल्या विद्यापीठ विकास मंच पॅनलचे उमेदवार सागर वैद्य यांच्यासह उमेदवार निवडून आले आहेत. एकूण दहा जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात होते. विद्यापीठ विकास मंच या भाजपने पाठिंबा दिलेल्या तर महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सामना रंगला होता. रविवारी मतदान झाले. एकूण २६.८५ टक्के मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. मंगळवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला.
विद्यापीठ विकास मंचचे खुल्या गटातील उमेदवार सागर वैद्य यांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिकच्या विजय सोनवणे यांनी एन टी गटातून तर बागेश्री मंठाळकर यांनी महिला राखीव जागेवर विजय मिळवला. गणपत नांगरे यांनी एस टी राखीव जागेवर विजय मिळवला. त्यांना आठ हजारपेक्षा अधिक मते मिळाली. एस सी राखीव जागेवर राहुल पाखरे निवडून आले आहेत. वैद्य यांच्याबरोबरच प्रसन्नजीत फडणवीस हेही खुल्या जागेवर निवडून आले आहेत.
विजयी उमेदवार असे (कंसात मिळालेली मते)
खुला गट – सागर वैद्य (३७११), प्रसन्नजीत फडणवीस (४४४७)
एनटी गट – विजय सोनवणे (१४,१०१)
महिला राखीव – बागेश्री मंठाळकर (१५,६४९)
एसटी गट – गणपत नांगरे (१३,९९५)
एस सी गट – राहुल पाखरे
ओबीसी गट – सचिन गोर्डे (१३,४४२)
अन्य विजयी उमेदवार असे – संतोष ढोरे, युवराज नरवडे, दादाभाऊ शिनळकर
सिनेट पदवीधर निवडणूकीत नाशिककरांनी विद्यापीठ विकास मंचला दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. १५ वर्ष प्रामाणिक पत्रकार म्हणून केलेल्या कामाची पावती मतदारांनी निवडणुकीतून मला दिली असे मी मानतो. माझ्यासारख्या कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्था, नेते,पक्ष एकत्र आले याचा आनंद आहे. या निर्भेळ यशाचे श्रेय अभाविपचे आमचे नेते श्री. राजेश पांडे, डॉ.राजेंद्र विखे, अॅड नितीन ठाकरे, डॉ.गजानन एकबोटे तसेच डॉ.अपूर्व हिरेंसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे आहे.
– सागर वैद्य, सिनेट सदस्य
Pune University Senate Election Result Declare