शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे भूमीपूजन; ५ कोटींच्या निधीचीही घोषणा

by Gautam Sancheti
जून 17, 2022 | 4:35 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20220617 WA0022 e1655463867113

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच येथील नाविन्यपूर्ण अध्यासन केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी प्राधान्य असेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे तर मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी काळे, प्र.कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, प्राचार्य विश्वास गायकवाड, डॉ. विजय सोनवणे, डॉ.राजेश पांडे, डॉ.प्रफुल्ल गायकवाड, डॉ.अमित पाटील, डॉ.नंदू पवार, डॉ.तान्हाजी पवार, डॉ.मोतीराम देशमुख, सरपंच सुनीता निंबाळकर, माजी सरपंच पांडुरंग गडकरी यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,नाशिक उपकेंद्राची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी आणि नाशिकमध्ये या विद्यापीठाचे स्वतंत्र्य कॅम्पस उभारण्यासाठी कित्येक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील होतो. विद्यापीठाचे काम इतके वाढले आहे की, त्याचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले. त्यातून आज हे उपकेंद्र उभे राहत आहे याचा आनंद आहे. नाशिक मध्ये अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. मुंबई पुण्यानंतर नाशिकची शैक्षणिक वाटचाल अत्यंत वेगाने सुरु असून देशभरातील तसेच विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिकला येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आगामी काळातील नाशिकचा शैक्षणिक विस्तार व शिक्षणाच्या रुंदावलेल्या कक्षा लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे सक्षमीकरण करून येथे विद्यापीठाचा ‘नाशिक कॅम्पस’ सुरु करण्याचा शासनाने दि.२४ जुन २०१३ रोजी निर्णय घेतलेला होता. साधारण सन २०१२-१३ साली आम्ही हे कॅम्पस सुरु व्हावे यासाठी सातत्याने बैठका घेत होतो विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे हे त्यावेळी उच्च-शिक्षण मंत्री होते. २०१४ साली या उपकेंद्रासाठी मौजे शिवनई येथील ६२ एकर जागा निश्चित करण्यात आली होती. पण नंतरच्या पाच वर्षात या उपकेंद्राचे काम रखडले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आम्ही या कामाला गती दिली आणि आज अखेर कॅम्पसचा भुमिपुजन सोहळा पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सुरुवातीला जमीन हस्तांतरणासाठी यात अनेक अडचणी आल्या होत्या काही शेतकऱ्यांचा विरोध होता, पण आम्ही त्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि ही जमीन विद्यापीठाला देण्यात आली. मी या माध्यमातुन त्या सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी शैक्षणिक कार्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली. मात्र मी त्या सर्व गावकऱ्यांना आश्वसत: करतो की तुम्हाला या भागात लागणाऱ्या रस्ते, वीज, पाणी इ. सर्व पायाभुत सुविधा आम्ही निश्चितपणे प्राधान्याने उभ्या करु असे आश्वासन त्यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिले.

ते म्हणाले की, नाशिकमध्ये एज्युकेशन हब निर्माण व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहे. त्यासाठी नाशिक मध्ये होत असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अतिशय महत्वाचे ठरणार आहे. युजीसी व एआयसीटीईच्या माध्यमातून विविध शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करून मोफत शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच शहराची वाढती शैक्षणिक गरज लक्षात घेऊन केंद्रीय विद्यालयांची निर्मिती. तसेच केंद्र शासनाच्या व्यवसायाभिमुख केंद्रीय महाविद्यालयांची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे आधुनिकीकरण करून येथे तज्ज्ञ शिक्षक, ऑडीओ व्हिज्युअल वर्ग, सुसज्ज वाचनालये निर्माण करण्यात येऊन ‘नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, काही दिवसांपुर्वी नाशिक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून घेतले आहे. त्याचे देखील काम काहीच दिवसात सुरु होणार असून थोड्यात दिवसात पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. आगामी काळात विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी लागणारी सर्वत्तोपरी मदत करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. नाशिक उपकेंद्रास देशात मान्यता मिळेल असे काम याठिकाणी उभारण्यात यावे. शहरी भागासारखाच ग्रामीण भागात देखील शिक्षणाचा प्रसार व्हावा या हेतुने शैक्षणिक सुविधा, प्रशासकीय बाबी, संशोधन, विस्तारीत कार्य यांचे विकेंद्रीकरण करण्याचा जो निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे तो कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ चालवले जात आहे. त्या सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहचवायचे असतील तर त्याचा एकमेव मार्ग हा शिक्षण असल्याचे सांगत जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्याला घ्यायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मजबुतीने उभे रहावे. देशाला विश्वगुरु बनविण्यासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चार महिन्यात ४७ एजन्सीज बडतर्फ; आता महावितरणकडून अचूक मीटर रीडिंग, तक्रारींमध्ये घट

Next Post

मलिक-देशमुख यांना विधान परिषदेसाठी तरी मतदान करता येईल का? हायकोर्ट म्हणाले…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Untitled 16
महत्त्वाच्या बातम्या

भारताची पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस या शहारात सुरू होणार…

सप्टेंबर 13, 2025
Maharashtra Police e1705145635707
संमिश्र वार्ता

पोलीस भरतीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मिळणार संधी….

सप्टेंबर 13, 2025
accident 11
स्थानिक बातम्या

ताहाराबाद – अंतापूर मार्गावर पिकअप व्हॅन आणि टाटा कारचा अपघात…तीन जणांचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

सप्टेंबर 13, 2025
Next Post
malik deshmukh

मलिक-देशमुख यांना विधान परिषदेसाठी तरी मतदान करता येईल का? हायकोर्ट म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011