पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दिवसांपूर्वीच गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांबाबत आदरभाव व्यक्त करण्यात आला. गुरुंप्रती श्रद्धा दर्शविणाऱ्या या दिवसाचे स्मरण डोक्यातून जात नाही तोच पुणे जिल्ह्यातील एका महाविद्यालयात झालेल्या प्रकाराने प्राध्यापक मंडळींमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली आहे. या महाविद्यालयात ख्रिश्चन धर्माची प्रार्थना झाली म्हणून प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये प्राचार्यांना मारहाण करण्याचा थरारक प्रकार घडला आहे. कॉलेजमध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना घेतली जात असल्यामुळे महाविद्यालयातील प्राचार्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अधिक माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील तळेगाव आंबी येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे महाविद्यालय आणि विद्यालय आहे. या महाविद्यालयातील लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे का लावले आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना का घेतल्या जातात, हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांन मारहाण करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओयामध्ये त्यांचे कपडे फाटल्याचे दिसत आहे. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. घटना घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर तहसीलदाराने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महाविद्यालय प्रशासन गप्प
लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याच्या प्रकरणाचा अहवाल अजून प्रलंबित असताना ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेवरून हा वाद झाला आहे. महाविद्यालय प्रशासन मात्र याबद्दल गप्प आहे. त्यांनी अद्याप त्यांच्या स्तरावर कुठलीही कारवाई केलेली नाही.
बदलीची मागणी
मुलांना चांगले संस्कार मिळतील या हेतूने आम्ही मुलांना शाळेत घालतो पण या ठिकाणी जर फक्त ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना घेतल्या जात असतील तर हे चुकीचे आहे. जोपर्यत या प्राचार्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे.