पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्यदिनापूर्वी १ ते २ दिवस अनेक ठिकाणी देशप्रेमावर आधारीत अनेक कार्यक्रम होत असतात. विशेषतः शाळा व शासकीय संस्था आदी ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतात. पुणे शहरांमध्ये देखील अशाप्रकारे सध्या कार्यक्रम होत आहेत. परंतु एका कार्यक्रमात अत्यंत अपमानास्पद घटना घडली. कोरेगाव पार्क भागातील एका पबमध्ये एका गायिकेने भारतीय राष्ट्रध्वज थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावला. तिच्या या कृत्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गायिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही आहे गायिका
स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम सादर करण्याच्या संदर्भात काही प्रोटोकॉल आहेत. मात्र आता सर्वत्र तिरंगा फडकवा या मोहीमेमुळे कोठेही तिरंगा फडकविण्यात येतो. कोरेगाव पार्क भागातील हॉटेल फ्रेक सुपर क्लबमध्ये कार्तिक मोरे याने स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. शांती पिपल म्युझिक बँडमधील गायिका उमा शांती हिने गाताना दोन्ही हातात राष्ट्रध्वज घेतला होता. राष्ट्रध्वज हातात धरुन ती नाचत होती. तिने प्रेक्षकांमध्ये राष्ट्रध्वज भिरकावला. राष्ट्रध्वज भिरकावणे हा एक प्रकारे राष्ट्रध्वजाचा आणि देशाचा आवमान आहे. वास्तविक या संदर्भात सर्वांनाच माहिती असते किंवा असावी परंतु अशा प्रकारे कृती करणे हे अत्यंत लाजिरवाणी आणि वाईट गोष्ट आहे.
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
कोणताही कार्यक्रम जल्लोषात साजरा करताना आपण नेमके काय करतो, याचे भान देखील असायला हवेत. आयोजकांना आणि कलावंतांना किंवा कलाकारांना याचे भान नसते. त्यातून एखादी विपरीत घटना घडते, अशाच प्रकारची घटना म्हणता येईल. याप्रकरणी गायिका उमा शांती तसेच आयोजक कार्तिक मोरे (रा. औंध) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबतची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Singer Indian Tricolor Flag Insult Crime FIR
Pub Hotel