पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याहून बँकॉक पाठोपाठ आता थेट सिंगापूरसाठीची आंतरराष्ट्रीय सेवा सुरू झाली आहे. या सेवेचे उदघाटन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे. पुण्याहून पहाटे २ वाजून १० मिनिटांनी विमान निघेल आणि सिंगापूरला सकाळी १०.३० वाजता पोहचेल. तसेच, सिंगापूरहून सकाळी ११.५० वाजता विमान निघेल आणि ते दुपारी ३.१० वाजता पोहचेल. ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी मिळणार आहे.
समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले पुणे शहर नवोन्मेष, शिक्षण आणि विकासाचे केंद्र बनण्यासाठी निरंतर आगेकूच करत असल्याचे सिंधिया आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले. या वाढीला चालना देत, पुण्याचा संपर्क वाढवण्यासाठी सरकारने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी संपर्क वाढवणे, नवीन टर्मिनल विकसित करणे आणि शहराला स्वतंत्र कार्गो टर्मिनल पुरवून पायाभूत सुविधा वाढवणे या सारख्या अनेक उपक्रमांची योजना आखली आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे-सिंगापूर उड्डाणाची सुरुवात ही पुण्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले. पुणे आणि बँकॉक दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या हवाई मार्गाचाही त्यांनी उल्लेख केला. हे दोन मार्ग पुण्याला केवळ महत्त्वाच्या जागतिक स्थळांशी जोडणार नाहीत, तर शहराच्या विकासासाठी रोजगार, शिक्षण, व्यापार आणि व्यवसाय या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध करून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन टर्मिनल आणि अन्य सुविधा
टर्मिनलची वाढती वर्दळ लक्षात घेत 475.39 कोटी रुपये खर्च करून नवीन टर्मिनल बांधले जात आहे. त्यामुळे टर्मिनलचे वर्तमान क्षेत्र 22,500 चौरस मीटरवरून वाढून 48,500 चौरस मीटर होईल. पुण्यातून निर्यातीला चालना देण्यासाठी, एक नवीन आंतरराष्ट्रीय एअर कार्गो टर्मिनल देखील बांधले जात आहे जे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल. पुणे विमानतळावर 120 कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेली बहुस्तरीय पार्किंग सुविधा नुकतीच 25 नोव्हेंबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आली आहे.
We are delighted to be the only Indian airline to spread the new feeling from Pune to Singapore! Here are some snippets from the celebration of the inaugural flight between Singapore and Pune at the respective airports. pic.twitter.com/fOBsYFIevV
— Vistara (@airvistara) December 2, 2022
Pune Singapore Non Stop Flight Started
Air Service International