पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांचे वय८० असून सांगलीत राहतात. त्यांचे मूळ नाव मनोहर असून यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी आहे. यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महापुरुषांचा अपमान प्रकरणानंतर त्यांच्यावर आता आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच भिडेंबरोबरच आणखी १५० जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांचा आदेशाला विरोध करत मार्गदर्शन बैठक घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परवानगी नसतानाही
खरे म्हणजे भिडे यांनी वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१५० जणांवर गुन्हा दाखल
नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.भिडे यांना मार्गदर्शक बैठक घेण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतरही भिडेंनी मार्गदर्शक बैठक घेतली. या बैठकीत नेहमीप्रमाणे कडे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस कर्माचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, याची दखल घेत संभाजी भिडेंबरोबर राजेंद्र आव्हाळे, बाळासाहेब नेवाळे, राहुल उंद्रे यांच्यावर गुन्हा नोदवला गेला आहे.
Pune Shivpratishthan Sambhaji Bhide FIR Booked