मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फी भरली नाही म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढण्याचा प्रकार पुणे येथे घडला आहे. या संतापजनक प्रकारावर पालकांसह समाजातील विविध घटकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी शाळेची फी न भरल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यात समोर होता. वाघोलीतील लेक्सिकॉन शाळेतील ही घटना आहे. वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी आणि मनसे पदाधिकारी यांनी शाळेविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. संबंधितांवर खंडणी आणि अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली होती. त्यानंतर आता वर्गातून बाहेर काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शाळा व्यवस्थाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्य म्हणजे शाळेच्या पहिल्याच दिवशी फीच्या मुद्द्यावरून वर्गातून बाहेर काढणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. हा संपूर्ण प्रकार पालकांना कळल्यानंतर त्यांनी शाळेच्या बाहेरच ठिय्या मांडला. अनेक पालक शाळेबाहेर जमले होते. त्यांनी शाळा प्रशासनाला वारंवार जाब विचारला. त्यानंतर शाळेने समोपचाराची भूमिका घेत पालकांची समजूत काढली आणि फी भरण्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर काही वेळाने पालक आणि शाळा प्रशासनाचा वाद मिटला.
१५० विद्यार्थ्यांसोबत घडला प्रकार
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक राष्ट्रवादी नेते नितीन कदम यांना या प्रकाराबाबत काही पालिकांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. तेव्हा साधारण १५० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याचे पुढे आले.
Pune School Fees Students Guardians