पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोणत्याही मोठ्या प्राण्यांची हत्या करणे हा गुन्हा ठरतो, प्राणी प्रेमी संघटनांकडून या संदर्भात श्वानांची हत्या केल्यास प्राणी प्रेमी संघटनांकडून याबाबत नेहमीच आवाज उठवून जनजागृती केली जाते. पुणे शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच माणसांना नव्हे तर प्राण्यांना देखील ही वाहने उडवतात. लॅम्बोर्गिनी या अत्यंत महागड्या कारने एका श्वानाला उडवले. या संदर्भात फिर्याद दाखल केली, असता पोलिसांनी सखोल चौकशी करून गुन्हेगाराचा शोध घेतला आहे. भरधाव लॅम्बोर्गिनी कारच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या श्वानाला अखेर न्याय मिळाला आहे.
मोटारचालकास अटक
पुण्यात वाहनांची संख्या खूपच वाढली आहे. गोखले चौकात एका भरधाव महागड्या मोटारीने ‘डॉन’ नावाच्या श्वानाला खूप लांब फरफटत नेले होते. मुख्य गोष्ट म्हणजे अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपली होती. प्राणीप्रेमींनी चित्रीकरण पोलिसांना दिले होते. डेक्कन जिमखाना येथील गोखले चौकात एका मोटारीने श्वानाला फरफटत नेले होते. पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रसाद वसंत नगरकर यांची ही लॅम्बोर्गिनी कार आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालक नगरकर यांना अटक केली आहे. त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लॅम्बोर्गिनीही जप्त
पुण्यातील प्राणीप्रेमी नेहमीच जागृक असतात, त्यामुळे एका प्राणीप्रेमी कार्यकर्त्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. डेक्कन जिमखाना भागात वास्तव्यास असलेल्या एका सराफ व्यावसायिकाने दोन वर्षांपूर्वी महागडी मोटार खरेदी केली होती. महागडी मोटार भरधाव वेगाने चालवित असल्याप्रकरणी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर डेक्कन परिसर समितीच्या डॉ. सुषमा दाते यांनी मोटार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली असून, त्याची मोटार जप्त करण्यात आली. वाहनचालकांच्या बेदकार वाहन चालविण्याच्या वर्तनाबाबत संताप व्यक्त होत आहे.
pune road accident dog death Lamborghini car owner arrested