इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्राजंल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रज्ञा खोसले यांच्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा दावा केला आहे. या हॅाटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या तक्रारीवरुन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून त्यांनी सांगितले की, सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदाराने अर्जात, पुण्यात ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी प्रांजल खेवलकर यांनी २८ वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक करुन अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचे रॅकेट दिसून येत आहे. सदर प्रकरण संघटित गुन्हेगारीचे तसेच मानवी तस्करीचे असल्याचा संशय अर्जदाराने व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कार्यवाही व्हावी असे नमूद केले आहे. आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी. विरोधी पथक, सायबर विभाग यांचे मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहे. तर प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहे. त्यामुळे या प्रकरणात एकमेकांविरुध्द नेहमी सोशल मीडियातून टीका करणा-या महिला नेत्या पुन्हा एकदा आमने – सामने आल्या आहे.