पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसात पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलाचा विनयभंगा हाणामारी,भुरटया चोऱ्या अशा प्रकारचे घडत आहेत, त्यातच पुणे रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात पहाटे चार वाजेच्या एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीला बेदम मारहाण केली आहे. ही संतापजनक घटना घडल्यानंतर तेथे गर्दी जमा झाले परंतु हा संशयित करून तिथून पसार झाला.
भूयारी मार्गात
याप्रकरणी २३ वर्षीय पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. सदर फिर्यादी महिला रविवारी पहाटे पतीसमवेत महाराष्ट्र एक्स्प्रेसने पुण्यात रेल्वे स्टेशनवर उतरली. तेथून हे दांपत्य रेल्वे स्टेशनलगतच्या भुयारी मार्गातून पायी निघाले होते. त्यातच गर्दी असल्याने तसेच पावसाचे पाणी साचल्याने चिखल झाला होता. त्यामुळे भुयारी मार्गाच्या पायऱ्यांवरून उतरताना महिलेच्या पतीचा पाय घसरला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने महिलेचा विनयभंग केला.
शिवीगाळ व मारहाण
याबाबत महिलेच्या पतीने जाब विचारल्यानंतर अनोळखी तरुणाने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेनंतर तो तरुण पसार झाला. घटनेनंतर महिलेसह तिच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गु्न्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बाहेरगावाहून आलेले अनेक प्रवासी, नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. महिलेच्या विनयभंगाच्या घटनेवरून भुयारी मार्गामध्ये रात्रीच्या वेळी पोलिसांची सुरक्षा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेबद्दल रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.