रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक… चक्क कोचिंग क्लासची प्रश्नपत्रिकाच सरकारी परीक्षेत… असा झाला भांडाफोड

by India Darpan
ऑगस्ट 4, 2023 | 1:36 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती संस्थेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. खासगी कोचिंग क्लासची प्रश्नपत्रिकाच थेट एमपीएससीच्या विद्यार्थअयांना देण्यात आली. यासंदर्भात आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आवाज उठवला आहे.

अभाविपचे प्रदेश कार्यालय मंत्री धनंजय शेरकर यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्र राज्यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेमार्फत इतर मागास वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना राबवल्या जातात. ३० जुलै २०२३ रोजी संस्थेकडून एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग पुरवण्यासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र भरातील विद्यार्थ्यांनी विविध केंद्रावर जाऊन ही परीक्षा दिली, मात्र या परीक्षेच्या बाबतीत एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. पुणे येथील ज्ञानदीप या खाजगी शिकवणीकडून पूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी मालिकेतील प्रश्न जसेच्या तसे या परीक्षेत विचारण्यात आले, ही अतिशय गंभीर बाब आहे. यातून संस्थेच्या प्रशासकांना नेमकं काय साध्य करायचे आहे? या खाजगी शिकवणी मधील विद्यार्थ्यांनाच महज्योतीला सामावून घ्यायचे आहे का? असे प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहेत. यापूर्वी ही अशाच प्रकारच्या युपीएससी पूर्व प्रशिक्षण निवड परीक्षेत मास कॉपी झाल्यामुळे सदरील पेपर रद्द करण्याची नामुष्की महाज्योतीवर आली होती. वारंवार अशा घटना होत असताना, संबंधित खात्याचे मंत्री मात्र या सर्व प्रकरणांकडे दुर्लक्ष करत आहेत.

या घटनेमुळे महाराष्ट्रातील इतर मागास वर्गातील विद्यार्थी मात्र नाहक भरडला जात आहे. “या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच महाज्योतीने स्वतंत्र परीक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन यंत्रणा सुरू करावी.. पुढील पंधरा दिवसात सदर परीक्षा पुन्हा घेऊन निकाल लावण्यात यावेत. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या आवडीप्रमाणे शिकवणी निवडण्याची संधी देण्यात यावी. या सर्व मागण्या शासनाने तत्काळ पूर्ण कराव्यात व महाज्योती या संस्थेच्या अनागोंदी कारभारावर तत्काळ आळा घालावा, अन्यथा शासनाला विद्यार्थ्यांच्या रोषला सामोरे जावे लागेल, “असे मत पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई-गोवा हायवे खड्ड्यात… अभिनेत्रीने शेअर केला हा व्हिडिओ…

Next Post

सावधान… ऑगस्टच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील जलसाठा चिंतानजक…

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सावधान... ऑगस्टच्या प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील जलसाठा चिंतानजक...

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011