पुणे – समस्त पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. शनिवार आणि रविवार राज्यात विकेंड लॉकडाऊन असला तरी शहर परिसरातील पर्यटनस्थळांकडे पुणेकर जातात. परिणामी कोरोनाच्या निर्बंधांची पायमल्ली होऊन संसर्ग पसरण्याचा धोका आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळेच आता पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर कलम १४४ लागू करण्यात आला आहे. म्हणजेच, येथे नागरिकांना येथे जमता येणार नाही. याची कडक अंमलबजावणी आजपासूनच सुरू झाली आहे. पोलिसांनी वाहनांच्या तपासणीसह पर्यटनस्थळांवर पहारा सुरू केला आहे. त्यामुळे कलम १४४चे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. तसेच पर्यटनस्थळाऐवजी थेट कारगृहाची हवाईही खावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन पर्यटनस्थळी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे शहरालगतच्या सर्वच पर्यटनस्थळी आज दिवसभर पोलिसांचा खडा पहारा दिसत आहे. त्याद्वारे पोलिसांकडून अनेकांवर कारवाई सुरू आहे.