पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील कुख्यात कोयता गँगसह इतर अनेक गुंडांना पोलिसांनी गजाआड केले आहे. पुण्यात जी-२० परीषद होणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाचेही विविध कार्यक्रम होतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात पोलिसांना कोयता गँगच्या म्होरक्याला अटक करण्यात यश आलं.
विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या निमित्ताने पोलिसांनी पुण्यात मोठी मोहीम राबविली. त्यात रात्रभर कोंबिंग अॉपरेशन चालविण्यात आले. यात फरार आरोपी, तडीपार, मकोकामधील गुन्हेगार, सर्राईत गुन्हेगारांना अटक केली आहे. तर जवळपास चार हजार गुन्हेगारांची कसून चौकशी केली. यात गुन्हेगारांकडून १४५ कोयते, पिस्तुक व काडतुसे जप्त करण्यात आली. कोयता गँगमधील १३ जणांवर पोलिसांनी मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. यात म्होरक्या समीर लियाकत पठाण याचा समावेश आहे. याच्या गँगमधील सर्व गुन्हेगारांवर पुण्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या भागात होती दशहत
पुण्यातील सिंहगड रोड, वारजे, भारती विद्यापीठ या परिसरांमध्ये कोयता गँगने दहशत माजवली होती. भवानी पेठेतही एका हॉटेलबाहेर तोडफोड करण्यात आली होती. विशेष म्हणजे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी अलीकडेच सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Pune Police Koyta Gang Big Action Investigation