मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यातील भोरजवळ एका सत्ताधारी नेत्याच्या गाडीत ५ कोटीची रोकड आढळून आल्याची घटना घडली. विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरु केली आहे. या नाकाबंदीच्या वेळेत एका गाडीत ही रक्कम पोलिसांना आढळून आली. या रक्कमेची माहिती पोलसांनी इन्कम टॅक्स विभागाला दिली आहे. पुण्यात सोमवारी सायंकाळी ही कारवाई पोलिसांनी केली आहे.
ही इनोव्हा क्रिस्टा ही कार सांगोल्याची असून नलवडे नावाच्या व्यक्तीची ही गाडी आहे. या कारमधून ही रोकड नेण्यात येत होती. ही कार सत्ताधारी व्यक्तींची असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान ही कारवाई पोलिसांनी केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले
१५ कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके?