पुणे – कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असल्याने हैराण झालेल्या नागरिकांनी आता आंदोलनास प्रारंभ केला आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालाबाहेर अनेक नागरिक ठिय्या आंदोलन करीत आहेत. राज्यात सध्या कलम १४४ लागू असतानाही इंजेक्शनसाठी नागरिकांना ठिय्या आंदोलन करावे लागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा दिवसांपासून मी इंजेक्शनसाठी वणवण भटकते आहे. मात्र, ते मिळालेले नाही. माझे वडिल आयसीयुमध्ये दाखल आहेत. त्यांना इंजेक्शनची नितांत गरज आहे. अखेर मी आता आंदोलनात उतरल्याचे एका महिलेने सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये काही संतप्त नागरिकांनी आंदोलन केले होते. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत आश्वासन दिले जात असले तरी त्यास फारसे यश येत नसल्याचे दिसून येत आहे.
https://twitter.com/ANI/status/1382588139051487233