पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. २०२१ मध्ये भारतात ४ लाखांहून अधिक रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये १.५५ लाख लोकांचा बळी गेला आहे. तरीदेखील वाहनचालक ऐकायला तयार नाहीत. अशी एक घटना पुढे आली आहे. वाहनाच्या धडकेने मृत्यू झालेल्या एका सात वर्षीय मुलाला वाहनचालकाने फरफटत नेल्याचा संतापजनक उघडकीस आला आहे. ही घटना पिंपरी-चिंचवड परिसरातील दिघी आळंदी रोडवर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या सात वर्षीय मुलाचे नाव पार्थ प्रणव भोसले आहे. पार्थ आणि त्याची आई स्कुटीवरून सर्व्हिस रोडने चऱ्होली चौकातून दिघीच्या दिशेने जात होते. तेव्हा, आरोपी राहुल तापकीर याने भरधाव मोटारीने त्यांना उडवले यात पार्थची आई खाली पडली तर पार्थ हा मोटारीच्या खाली अडकला गेला. त्याला ७०० ते ८०० मीटर फरफटत नेले. पार्थचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
दरम्यान, संतापलेल्या नागरिकांनी मद्यधुंद असलेल्या राहुल तापकीर याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला दिघी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दिघी पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक पंडित यांनी दिली आहे. राहुलने आणखी काहीजणांना उडवले असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या दिशेने पोलिस तपास करत आहेत.
भारतात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या खूप वाढली आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०२१ मध्ये देशात दर तासाला ४६ रस्ते अपघात झाले. ही माहिती बंगळुरुतील मर्सिडीज-बेन्झ रिसर्च अँड डेव्हलमेंट इंडियाने जाहीर केली आहे. बंगळुरुतील सुरक्षित रस्ते शिखर संमेलनात ही माहिती सादर करण्यात आली आहे. पोलिसांच्या एनसीबीआर अंतरिम अहवालानुसार २०२१ मध्ये भारतात ४,०३,११६ गंभीर रस्ते अपघात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा समाजमन सुन्न झाले आहे.
Shocking….even after death a seven year old boy was taken away Pune PCMC Road Accident Rash Driving Car Dighi Alandi Road Scooty Boy