बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पिंपरी-चिंचवडकरांनो, इकडे लक्ष द्या! तुमच्या पैशाची उधळपट्टी होतेय

by India Darpan
जून 30, 2023 | 5:09 am
in राज्य
0
PCMC

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी-चिंचवडमध्ये एक स्टेडियम असताना दुसरे स्टेडियम कशाला हवे, असा वाद सध्या रंगत आहे. गहुंजे आणि मोशी या दोन ठिकाणांवरून हा वाद आहे. यासंदर्भात कोट्यवधीची उधळण कशासाठी केली जात आहे, असा प्रश्नही राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

पुणे जिल्ह्यात पुणे, गहुंजे व बारामती अश्या तीन ठिकाणांवर क्रिकेट स्टेडियम आहेत. पिंपरी-चिंचवड शहरालगत गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असताना मोशी येथे नव्याने क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा घाट कोणाच्या सांगण्यावरून घातला जात आहे, असा प्रश्न स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विचारला आहे. यामागे राज्यातील सत्तेत असणारे खोके सरकार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी हे अंतर्गत आर्थिक तडजोडी करून प्रशासनाला हाताशी धरून शहरातील जनतेच्या कररुपाने जमा झालेल्या कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करत असल्याचा संशय नाना काटे यांनी व्यक्त केला आहे.

तसेच नव्याने विकसित होणारे क्रिकेट स्टेडियम बीओटी, पीपीई, खासगी की पालिकेच्या निधीतून करायचे हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या सल्लागारासाठी कोट्यवधीची उधळपट्टी आणि क्रिकेट स्टेडियमचा घातलेला घाट तात्काळ रद्द करा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांनी दिला आहे. मोशीतील प्रभाग क्रमांक तीन येथील आरक्षण क्र.१/२०४ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणे. या कामासाठी सन २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात ४०० कोटी रुपयांस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने स्टेडियम उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती देण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

सल्लागाराची नियुक्ती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी ४०० कोटींचा खर्च गृहीत धरून स्टेडियम उभारण्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. या स्टेडियमच्या निर्माणावरून राष्ट्रवादी आक्रमक असले तरीही त्यांच्या वरिष्ठांनी अद्याप सरकारच्या विरोधात आवाज उठवलेला नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चक्क मंगलअष्टकांशिवाय झाले लग्न… मग, कोणते गाणे म्हटले? अहमदनगरच्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा

Next Post

काय सांगता! चक्क बायकोचे लावले ४ जणांशी लग्न; नवऱ्याच्या कृत्याची देशभर चर्चा

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

काय सांगता! चक्क बायकोचे लावले ४ जणांशी लग्न; नवऱ्याच्या कृत्याची देशभर चर्चा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011