पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर पिंपरी चिंचवड परिसराचे रहिवासी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, उद्या, शनिवार, १५ जुलै पिंपरी चिंचवडच्या काही भागात तब्बल ८ तास वीज पुरवठा बंद राहणार आहे. तशी माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्प भागातील पिंपरी कॅम्प (22 KV) उपकेंद्र येथे अत्यंत तातडीने दुरुस्तीचे कामेृ हाती घेतले जाणार आहे. त्यामध्ये ब्रेकर पोल बदलणे, ब्रेकर सर्व्हिसिंग करणे, अपघात प्रवरण ठिकाणचे (22 KV) उपरी वाहिनीची दुरुस्ती करणे अशा महत्वपूर्ण विविध कामांचा समावेश आहे.
उद्या, शनिवार, १५ जुलै) रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामध्ये पिंपरीगाव, वाघेरे आळी, माळी आळी, कुदळे कॉलनी, B-ब्लॉक, C-ब्लॉक, पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, भाटनगर, मिलिंदनगर आदी ठिकाणी वीजपुरवठा राहणार नाही. नागरिकांनी, ग्राहकांनी याबाबतची नाेंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.