पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘मै तेरा खून पी जाऊंगा ! ‘ एका हिंदी चित्रपटातील हा डायलॉग तथा संवाद सर्वांनाच पाठ आहे, परंतु एखाद्याने खरोखरच दुसऱ्याचे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली, तर कुणालाही आश्चर्य वाटेल ! तर काही जणांना ही घटना अशक्य वाटेल, परंतु एका मित्राने दारूच्या नशेत असताना दुसरा मित्राकडे चक्क त्याचे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली. अन् तसा प्रयत्न देखील केला. त्यातून जखमी झालेल्या मित्राने रागाच्या भरात रक्त पिण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या या आपल्या मित्राचा झोपेत असताना चक्क डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात खळबळ उडाली आहे.
अघोरी इच्छा व्यक्त केली आणि….
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोऱ्या, दरोडे, दुचाकी वाहने जाळपोळ, महिलांवरील अत्याचार, दहशतवाद यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा जणू काही गुन्हेगारीचा केंद्र बनत चालला आहे. त्यातच पिंपरी चिंचवड परिसरात मोशी भागात भीम ज्योती मंडळ संजय गांधीनगर येथे रात्री ही घटना घडली आहे. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, ही घटना म्हणजे एका मित्राने आपल्या मित्राकडे एक विचित्र तथा अघोरी इच्छा व्यक्त केल्याने, संतापलेल्या मित्राने त्याच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भोसरी पोलिसांनी आरोपी राहुल लोहार विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
दारु पार्टीत वाद त्यानंतर
दारूच्या नशेत कोणीही शुध्दीवर नसतो. इस्तियाक खान आणि राहुल लोहार हे दोघे मित्र रात्री मोशी परिसरामध्ये दारू पार्टी करत होते.या पार्टीदरम्यान दोघांमध्येही मोठा वाद झाला. इस्तीयाक खान याने राहुल लोहार याला मला तुझे रक्त प्यायचे आहे. अशी अघोरी मागणी केली होती. केवळ मागणी करुन तो थांबला नाही तर इस्तीयाक खान याने राहुल लोहारच्या मानेला आपल्या दातांनी चावा देखील घेतला होता. याचाच बदला घेण्याच्या हेतुने राहुल लोहारने झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तीयाक खानच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. कारण इस्तीयाक खानने राहुलच्या मानेचा चावा घेतला. तेव्हा राहुलने स्वतःची कशी तरी सुटका करून पळ काढला. मात्र त्यांनतर प्रकरण मिटले असे सर्वांना वाटले, पण काही वेळाने इस्तीयाक खान आणि त्याचा मित्र विशाल कांबळे हा एका ओट्यावर झोपला होता. राहुल लोहार तिथे पोहचला अन झोपलेल्या अवस्थेत असलेल्या इस्तीयाक खानच्या डोक्यात त्याने दगड घातला असून यात इस्तीयाक खान याचा जागीच मृत्यू झाला.
pune pcmc crime friend murder blood
primpri chinchwad moshi stone