पुणे – न विचारता पाणीपुरी आणल्याने रुसलेल्या बायकोनो थेट टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा धककादायक प्रकार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. पाणीपुरीवरुन सुरु असलेले भांडण तीन दिवस सुरु होते. पण, त्यात राग कमी न झाल्यामुळे बायकोने विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३) आहे. या प्रकरणात पती गहिनीनाथ सरवदे (वय ३३) याला पोलीसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे दोघे पती – पत्नी उच्चशिक्षित असून त्यांना एक मुलगाही आहे .त्यांचा २०१९ साली विवाह झाला होता. पण, या काळात दोघांचेही किरकोळ भांडण होत असे. पाणीपुरीवरुन एखादे टोकाचे पाऊन उचलणे ही गोष्ट गंभीरच आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, गहिनाथ कामावरून येताना पाणीपुरी बाहेरुन घेऊन आला. या पाणीपुरीमुळे दोघांचे भांडण झाले. मला न विचारता पाणीपुरी का आणली ? हे भांडणाला कारण ठरले. त्यानंतर प्रतिक्षाने दोन दिवस हे भांडण सुरुच ठेवले. त्यानंतर शनिवारी प्रतिक्षाने रसायण पिऊन आत्महत्यात केली. तीला तात्काळ रूग्णालयातही दाखल करण्यात आले. पण, उपचारा दरम्यान प्रतीक्षाचा मृत्यू झाला