पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुद्धा राज्य सरकार चालढकल करते आहे. जोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत, तोवर या सरकारला कारणे सांगायचे आहेत. या सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही असे सांगत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पुणे येथे माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बैलगाडी शर्यतीच्या प्रश्नावर सांगितले की, आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. पण ती मागे घेण्यासाठी या सरकारने कोणतीही पाऊले उचलली नाहीत. राज्य सरकारने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात असेही त्यांनी सांगितले.