पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा): पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतानाही काही बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि ह्युडांई मोटर्स आदी नामांकित उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देऊन युवकांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बेरोजगार तरुण-तरुणींनी अशा आमिषाला बळी न पडता स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, सरकारी अथवा खाजगी नोकरीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक रक्कम कोणत्याही कंपनी, कंत्राटदार, सल्लागार किंवा कंत्राटदारांनी देवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, पुणे जिल्हा यांनी केले आहे.