इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील हडपसरमधील सोसायटीत एका महिलने घरात तब्बल ३५० माजंरी पाळल्या असून त्यामुळे येथील सोसायटीतील नगारिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मांजरीच्या आवाजामुळे या सोसायटीतील रहिवासी हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे दुर्गंधीमुळे त्यांचा संताप वाढला आहे.
मार्व्हल बाऊंटी को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोयायटीमधील हा प्रकार आहे. वारंवार तक्रार करुनही या महिलेने दखल घेतली नाही. त्यामुळे या महिलेविरुध्द योग्य ती कारवाई करण्याची मागणी आता सोसायटीने पोलिसांकडे केली आहे.
सुरुवातीला या महिलेकडे ५० मांजरी होत्या. पण, नंतर त्यात वाढत गेल्या आता ३५० मांजरी झाल्याचे घरातील काम करणा-या मदतनीसने सांगितले. त्यामुळे सोसायटीत लोक हैराण झाले.