पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील समाधान चौकामध्ये पुणे महानगरपालिकेचा एक अख्खा ट्रक खड्डात गेला. सुदैवाने या घटनेत जीवीतहावी झालेली नाही. मात्र रस्ता असा कसा खचला याबद्दल पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले. शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मैलापाणी वाहिनी दुरुस्तीसाठी गेलेला ट्रक अचानक २५ फुट खड्ड्यात गेला. आता या घटनेनंतर सत्ताधारी व विरोधकांनी पु्न्हा एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केले आहे.
या घटनेनंतर खा. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिायवर या घटनेचा व्हिडिओ टाकत टीका केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘स्मार्ट सिटी’ म्हणतात ते हेच का मुख्यमंत्री महोदय? पुणे शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्ता खचून आख्खा ट्रक बघता बघता गायब होतो. ही घटना अतिशय भयंकर आणि रस्त्याच्या एकंदर दर्जा व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.
सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे.