पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यामध्ये नाना पेठमधील डोके तालीमच्या समोर साडेआठच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने वार करत गोळीबार करण्यात आला. आंदेकर यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. पण, एकही गोळी लागली नाही. पण, कोयत्याने वार करण्यात आल्यामुळे त्यांचा अखेर मृत्यू झाला.
वनराज आंदेकर यांना केईएममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा गोळीबार कौंटुबिक वाद व वर्चस्वाच्या वादातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, नाना पेठेत १४ ते १५ हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून जात हल्लेखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेचही समोर आले आहे.
वनराज यांच्यावर आधी कोयत्याने वार केले आणि त्यानंतर गोळीबार केला. वनराज आंदेकर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना तिथून हल्लेखोरांनी पळ काढला.