पुणे – चांद्यापासून बांद्यापर्यंत आता प्रत्येक पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन सुरू करावे लागणार आहे. केंद्र सरकारने तसे धोरण आखले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील निंबूत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता पॅलेस वातानुकूलित नुतन वस्तूच्या उद्घाटन समारंभात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक वाहनात वाढ होत आहे. पण, या गाड्यांचा चार्जिंगचा प्रश्न कायम आहे. त्यात चार्जिंग स्टेशन्सच्या संदर्भात पवार यांनी हे महत्वाचे वक्तव्य केले आहे.