पुणे – रिमाउंट व्हेटरीनरी कोरच्या सेवानिवृत्त माजी सैनिकांनी १४ व १५ डिसेंबर रोजी २४३ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून “अनिकेत सेवाभावी संस्था संचलित ॐ श्री साई ॐ मतिमंद मुला-मुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प, पुणे” येथे ५४ मतिमंद मुला-मुलीं समवेत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत सर व इतर शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व त्यानंतर सदर आश्रमास भेट देऊन त्या आश्रमातील मतिमंद मुला-मुलीं साठी एक छोटीशी भेट म्हणून वॉशिंग मशीन देण्यात आली.
सदर स्थापना दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर आरवीसी कोरचे माजी सैनिक सहभागी होतात. २०१८ पासून स्थापना दिवस साजरा करण्याची सुरुवात नाशिक येथून करण्यात आली. २०१९ साली सदर कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले होते. औरंगाबादचे डी आर थोरात, राजेंद्र बुट्टे, नामदेव शिंदे ,रघुनाथ कदम, सुधाकर वाघ व इतर माजी सैनिक यांनी औरंगाबाद येथे नियोजन केले. २०२० साली कोरोनामुळे सदर कार्यक्रम ऑनलाईन एकत्र येऊन साजरा करण्यात आला होता. २०२१ चा आरवीसी कोरचा स्थापना दिवस पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अनिल हाके, मच्छिंद्र खोमणे, संतोष शिर्के, औसर सिध्दू ,सतिश बोढरे व इतर माजी सैनिक यांनी खूप परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाकरिता नाशिक जिल्ह्यातून सुनिल पवार, विशाल सोनवणे, संजय बोरसे, जितेन्द्र पाटील, आनंद गायकवाड, संजय काळे, लक्ष्मण वाकचौरे, लक्ष्मण गुजर, किरण पगारे, गोरख बागुल, दत्तु कासार, शिवाजी बागुल, विजय देठे व पाटील हे आवर्जून उपस्थित होते.व तसेच सर्व महाराष्ट्रातून आरवीसी कोरचे जवळपास १०० माजी सैनिक कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.