पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओत सुरू असलेल्या पुतळ्याच्या कामकाजाची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती १२ फुटी पुतळ्यास सूचनांसह अंतिम मान्यता दिली. यावेळी प्रा.हरी नरके,विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश पांडे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, प्राचार्य संजय चाकणे, प्राचार्य सुधाकर जाधवर, प्रा. विजय सोनवणे, अभिमन्यू माळी, ऍड सुभाष राऊत, अविनाश चौरे पुतळा निर्मितीकार परदेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.