पुणे – तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. पुणे महापालिकेने एका विशिष्ट पदासाठी भरती सुरू केली आहे. ट्रॅफिक प्लॅनर या पदासाठी महापालिकेला उत्कृष्ट उमेदवार हवा आहे. कारण, पुण्यातील वाहतुकीची कोंडी महापालिकेला फोडायची आहे. विशेष म्हणजे, ट्रॅफिक प्लॅनरच्या पदासाठी परिक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखत घेतली जाणार आहे. तसेच, तब्बल २ लाख रुपयांचा पगारही महिन्याकाठी मिळणार आहे. त्यामुळे संधी दवडू नका. तुम्ही पात्र उमेदवार असाल तर तत्काळ अर्ज करा. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात बघा,