गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीज मीटर बदलण्यासाठी तुमच्याकडेही कुणी आले आहे… तातडीने हे वाचा…

by India Darpan
सप्टेंबर 20, 2023 | 5:15 am
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महावितरण कंपनीकडून मुंबई वगळता राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. मात्र वीजमीटर संथ झाले आहे. कनेक्शन दिल्यापासून तुम्हाला लाखो रुपयांचे बिल भरावे लागेल. आता आम्ही वीजमीटर बदलून देतो. त्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, अशी लबाडी करून, तसेच महावितरणचे कर्मचारी असल्याचे भासवून महावितरण आणि वीजग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाऱ्या भामट्यांची टोळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

थेट ग्राहकांशी संपर्क
वीज मीटर हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपण वापरलेल्या वीजेपेक्षा आपल्याला जास्त वीज बिल येते, असा अनेकांचा गैरसमज असतो. त्याचा फायदा घेतपुणे जिल्ह्यात चाकण परिसरात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती महावितरणला मिळाली होती. यामध्ये हे तोतया कर्मचारी वीजग्राहकांशी थेट संपर्क साधून वीज मीटर हळू चालत असल्याने मोठ्या रकमेचे बिल येणार आहे, हे बील भरले नाही तर वीजपुरवठा खंडित होणार आहे अशी भीती दाखवत आर्थिक लुबाडणूक करणे, जुने महावितरणचे मीटर काढून गहाळ करणे आणि त्या ठिकाणी बाजारातून खरेदी केलेले मीटर ग्राहकांकडे लावत असल्याचे गैरप्रकार होत असल्याची माहिती मिळाली होती.

अनेक वीज मीटर बदलली
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात शोध घेण्याचे ठरवून कसून चौकशी सुरू केली.या प्रकारच्या माहितीची मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी गंभीर दखल घेतली. पुणे ग्रामीण मंडलचे सर्व अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसह संशयास्पद वीजमीटरची तपासणी सुरु केली. यामध्ये चाकण येथील नाणेकरवाडी, आंबेठाण रस्ता, माणिक चौक परिसरात काही ग्राहकांकडे वीजमीटर बदलले आहे, परंतु त्याची महावितरणकडे नोंद नाही किंवा जुने मीटर महावितरणकडे जमा केले नसल्याचे आढळून आले. याबाबत संबंधित वीजग्राहकांना विश्वासात घेत अधिक तपास केला असता परस्पर वीजमीटर बदलून देणारा आरोपी दयानंद पट्टेकर हा मीटर रीडिंग घेणाऱ्या एका एजन्सीशी संबंधित असल्याचे उघड झाले. आरोपी पट्टेकर व अज्ञात तीन व्यक्तींनी महावितरणचे भरारी पथकाचे कर्मचारी असल्याचे भासवून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गेल्या ऑगस्ट महिन्यात तीन वीजग्राहकांकडील वीजमीटर परस्पर बदलून दिले. यामध्ये महावितरणचे सुमारे एक लाख २२ हजार २७७ युनिटचे म्हणजे १३ लाख २८ हजार २७० रुपयांचे नुकसान केले.

अखेर महावितरण म्हणाले
याप्रकरणी महावितरणकडून चाकण पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दयानंद पट्टेकर आणि तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले की वीजमीटरमधील वापर कमी दाखवणे, संथगतीसाठी मीटरमध्ये फेरफार किंवा वीजबिलाची रक्कम कमी करून देणे आदी आमिष दाखविणे तसेच महावितरणचा कर्मचारी असल्याचे भासवून किंवा अन्य खाजगी व्यक्तीने वीजग्राहकांकडे रकमेची मागणी केल्यास त्यास कोणताही प्रतिसाद देऊ नये. याबाबत महावितरणच्या संबंधित कार्यालयामध्ये कळवावे किंवा तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले.

Pune MSEDCL Electric Meter Change Crime Gang Arrest

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बापाने मुलाला काम सांगितले… पोराने केले थेट हे धक्कादायक कृत्य… पुण्यातील घटना…

Next Post

ज्येष्ठा गौरी म्हणजे नेमकं कोण? हा उत्सव का साजरा करतात? त्याचे काय फळ मिळते? (व्हिडिओ)

Next Post
jyestha gauri pujan

ज्येष्ठा गौरी म्हणजे नेमकं कोण? हा उत्सव का साजरा करतात? त्याचे काय फळ मिळते? (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011