इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पुणेकरांचे मोठे स्वप्न आज मेट्रोच्या रुपाने साकार झाले आहे. गेल्या काही वर्षात अतिशय वेगाने मेट्रो प्रकल्पाचे काम मार्गी लागले. त्यामुळेच आता पुणेकर मेट्रोने प्रवास करु शकणार आहेत. मात्र, नाशिकमध्ये होऊ घातलेली निओ मेट्रो कधी धावणार, तिचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न यानिमित्ताने नाशिककरांना पडला आहे. त्याचे उत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात नाशिक निओ मेट्रोचा उल्लेख केला. त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली की नाशिक निओ मेट्रो आणि नागपूरच्या दुसऱ्या टप्प्याच्या मेट्रोचा प्रस्ताव विविध पातळ्यांवर मंजूर झाला आहे. त्यास आता केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. येत्या काही दिवसातच त्यास मान्यता मिळेल, अशी खात्री फडणवीस यांनी बाळगली. बघा, ते नाशिक मेट्रोविषयी काय म्हणाले याचा व्हिडिओ….
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1500413205956345856?s=20&t=Fb7dWj_BhNtHv64MLDYLhA