पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सेवेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले, सहाजिकच पुणे मेट्रो हा सर्वांचाच उत्सुकतेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. पुणे शहरातील मेट्रो सेवेमुळे लाखो नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येते. पुणे मेट्रो लवकरच गरवारे कॉलेज ते दिवाणी न्यायालयापर्यंत आपली सेवा विस्तारित करणार आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे.
वनाझ आणि गरवारे कॉलेज स्थानकांदरम्यानचा रस्ता यावर्षी मार्चमध्ये सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हा विस्तार होत आहे. पुणे मेट्रोने एका निवेदनात म्हटले आहे, की वनाझ ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या पुणेमेट्रोच्या रिच २ मार्गातील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट या स्थानकांची कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतचा मेट्रो प्रवास सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.
वनाज ते सिव्हिल कोर्टदरम्यानचे पिलर यापूर्वीच उभे राहिले असून, रेल्वे रूळ टाकण्यासाठीच्या सेग्मेंट व व्हायाडक्टचे कामही पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर आता विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची पाहणी नुकतेच डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केली. या स्थानकांसोबतच अन्य कामेही वेगाने पूर्ण करून येत्या काही महिन्यांत वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रो धावू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वनाझ स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंतची एलिव्हेटेड लाइन लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच या मार्गावर मेट्रो धावेल. या मार्गावरील डेक्कन स्टेशन, छत्रपती संभाजी स्टेशन, पुणे महानगरपालिका स्टेशन आणि दिवाणी न्यायालय स्टेशनचे काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल.
पुणे मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे आता लवकरच पुणे मेट्रो वनाज ते शिवाजीनगर असा प्रवास करणार आहे. वनाज ते शिवाजी नगर न्यायालय या मार्गावर जोरात काम सुरु होतं. याच मार्गावरील व्हायाडक्ट म्हणजेत दोन खांबांना जोडण्याचं काम पुर्ण झालं आहे. पुण्यातील मेट्रोचा हा महत्वाचा टप्पा मानल्या जात होता. त्यामुळे लवकरच प्रवासी सेवा सुरु करण्याच्या तयारी मेट्रो प्रशासन आहे. सुरुवातील वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत मेट्रोचे काम पुर्ण झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटनही करण्यात आले होते. त्यानंतर पुणे मेट्रोच्या कामाला वेग आला. प्रत्येक परिसरात काम सुरु असून त्यामुळे आता लवकरत पुणेकरांना वनाज ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रवास करता येणार आहे.
पुणे मेट्रोचे काम टप्प्यात विभागल्या गेलं आहे. एक टप्पा पिंपरी-चिंचवड स्थानक ते शिवाजीनगर सत्र न्यायालय, वनाज ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, रामवाडी स्थानक ते शिवाजीनगर स्थानक, तसेच भूमिगत मार्गिकेपैकी स्वारगेट स्थानक ते शिवाजीनगर सत्र न्यायालय, रेंज हिल स्थानक ते शिवाजीनगर असे कामाचे टप्पे करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पीएमआरडीए (PMRDA) आणि ‘महामेट्रो’कडून सुमारे 43 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीच्या मार्गासह एकूण 66 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण होणार आहे. त्यामध्ये खडकवासला ते स्वारगेट, हडसपर ते सासवड आणि स्वारगेट ते रेसकोर्स या मार्गांचा समावेश आहे.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटया मेट्रो प्रकल्पाचे काम महामेट्रोने हाती घेतले आहे तर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला तर खडकवासला ते खराडी हा 28 किलोमीटरचा मार्ग होणार आहे. विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे.
विशेष म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार, पुणे महानगरपालिका आणि इतर सर्व शासकीय संस्थांच्या सक्रिय पाठबळामुळे आणि सहकार्यामुळे हे काम शक्य झाल्याचे ब्रिजेश दीक्षित म्हणाले. येत्या काही महिन्यांत दिवाणी न्यायालय स्थानकापर्यंत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू करणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो)द्वारे राबविण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. पुणे मेट्रोने रीच 2 मार्गावरील व्हायाडक्टचे काम पूर्ण केल्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पुणे मेट्रोची एकूण लांबी 33.2 किमी आहे आणि त्यात 30 स्थानके आहेत. यात पाच भूमिगत स्थानके आणि 25 उन्नत स्थानके आहेत.
Pune Metro Service Expansion Work Detail Project Report