नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लव्ह जिहाद विरोधी तसेच धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्येसारखी घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यावा यासह विविध मागणीसाठी चिंचवड येथे विविध हिंदू संघटनानी रविवारी विरोट मोर्चा काढला.
मोर्चाद्वारे विविध मागण्यांना वाचा फोडत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाजाच्यावतीने लहुजी वस्ताद,साळवे स्मारक चिंचवड येथून रविवारी सकाळी दहा वाजता या विराट मूक मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये विविध राजकीय पक्ष, संघटना, संस्था यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मोर्चात महिला व युवतींचा सहभाग लक्षणीय होता. तिरंगा, भगवे ध्वज तसेच विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी भगव्या टोप्या, फेटे आणि गळ्यात मफलर परीधान करून सहभागी झाले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही करण्यात आली. लव जिहाद,गोहत्या धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करण्यात यावा. श्रद्धा वालकर या हिंदू भगिनीचा मारेकरी आफताब पुनावाला या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशा विविध मागण्या विराट मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चा जात असलेल्या मार्गावरून दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत मोर्चाला पूर्ण समर्थन देत होते.
लहुजी वस्ताद,साळवे स्मारक चिंचवड येथून निघालेला विराट मोर्चा शहरातून विविध मार्गाने प्रशासकीय कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी प्रशासनाला निवेदन दिले. मोर्चा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षकांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक काही काळासाठी अन्य मार्गावरुन वळवण्यात आली तर काही मार्गावर वाहतूक कासवगतीने पूढे सरकत होती.
दिल्लीतील श्रद्धा वालकर हिचा अत्यंत निर्घृण खून केलाचा आरोप असलेल्या आफताब पुनावाला याला क्षणभरही जगण्याचा अधिकार नाही. या नराधमाला मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चाकर्यांनी यावेळी केली. देशभरात वाढू पाहणाऱ्या लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोवंश हत्या, बेकायदेशीर धर्मांतरण, महापुरुषांचा अवमान आदी विकृतींविरोधात रविवारी हिंदू धर्मातील विविध संस्था आणि संघटनांनी एकत्र येऊन विराट मूक मोर्चा काढत एकीची वज्रमूठ भक्कम केली.
https://twitter.com/sameerbhosale44/status/1604367107289845760?s=20&t=qk4Dev3ovf6x6hkTQrFoZQ
Pune Love Jihad Chinchvad Morcha