शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्यातील संगमवाडीत होणार क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे भव्य स्मारक

by India Darpan
जुलै 15, 2023 | 5:21 am
in राज्य
0
lahuji salve e1689344748127

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी या स्मारकाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. हे स्मारक लवकरात लवकर उभे रहावे अशी शासनाची भूमिका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, त्यासाठी स्मारकात समाविष्ट करावयाचे संग्रहालय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आदी तपशीलाबाबत समितीने चर्चा करुन निर्णय घ्यावा. स्मारकाचा आराखडा समितीच्या सूचनेनुसार तयार करण्यात यावा. स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी या स्मारक, संग्रहालयासाठी सुमारे साडेपाच एकर जागा संपादित केली असून ती पूर्णता महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. जमीन संपादनासाठी सुमारे १०१ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित वास्तूविशारदांनी स्मारकाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावर मंत्रीमहोदय तसेच समिती सदस्यांनी काही सूचना दिल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

५० लाख भर नाहीतर तुरुंगात जा… अभिनेता अरमान कोहलीवर ही वेळ का आली

Next Post

शरद पवारांच्या सभेनंतर भुजबळ पहिल्यांदाच येवल्यात…. असे झाले जंगी स्वागत

Next Post
45d22ee339e74ee5baad03992910cfc9 1 e1689349129519

शरद पवारांच्या सभेनंतर भुजबळ पहिल्यांदाच येवल्यात.... असे झाले जंगी स्वागत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011