मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही महिन्यांमध्ये शिक्षकांद्वारे लैंगिक शोषणाच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. विशेषत: शिक्षणाचे माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे येथे अशा घटनांनी कहर केला आहे. अशात अजून एका याच प्रकारच्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
पुणे शहरातील एका शाळेत तीन वर्षीय विद्यार्थीनीसोबत महिला शिक्षिकेने अश्लिल कृत्य केल्याचा प्रकार घडला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी कोथरूड परिसरातील एका शाळेत शिक्षण घेते. मुलीने शाळेतून घरी आल्यानंतर शिक्षिकेविरोधात आपल्या वडिलांकडे तक्रार केली. ज्यामध्ये तिने ‘अंजना टीचर शाळेत केस ओढतात, गालगुच्ची घेतात, हात कापू का, तुला मेणबत्तीचे चटके देईन, आणि घरच्यांना सांगायचे नाही’, असे म्हणत असल्याचे सांगितले. मुलीच्या तक्रारीनंतर पालकांनाही धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत संबंधित महिला शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, कोथरूड पोलीस ठाण्यात ४० वर्षीय शिक्षिके विरोधात भादंवि ३२३,५०६, ज्यूवेनाईल जस्टीस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
वाढतेय मुलांचे लैंगिक शोषण
अमेरिकन ब्युरो ऑफ जस्टिस स्टॅटिस्टिक्सच्या २००० च्या अभ्यासानुसार, १७ वर्षांखालील सर्व ज्ञात पीडित ७.५ टक्के महिला आणि ५ टक्के पीडित पुरुषांवर अपरिचित व्यक्तीने अत्याचार केल्याचे आढळले. ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीत असे आढळले आहे की, ११.५ टक्के मुली आणि १५ टक्के मुलांचे १६ वर्षांपेक्षा कमी वय असताना लैंगिक शोषण करण्यात आले होते. आतापर्यंतच्या संशोधनानुसार, वयात येण्यापूर्वी दहापैकी एका मुलावर लैंगिक अत्याचार होतात. यात मुलींचं प्रमाण १४ टक्के, तर मुलांचं ४ टक्के आहे. सात मुलींपैकी एक मुलगी बालपणीच लैंगिक अत्याचाराची शिकार झालेली असते, तर २५ मुलांपैकी एका मुलाचे लहानपणी लैंगिक शोषण झालेले असते.
Pune Kothrud Crime School Teacher Girl Misbehave
Education Student Police Complaint