पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दैवं बलवत्तर असेल तर कितीही भीषण परिस्थिती येवो जीव वाचत असल्याच्या घटना आपण बघत असतो. असाच प्रकार पुणे येथे घडला आहे.
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहे. या अपघाताचा भीषण व्हिडिओ समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर आज सकाळी ९ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. या अपघातात काही शाळकरी मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील कोंढवा स्मशानभूमीजवळ हा अपघात झाला. या अपघातात तब्बल ११ गाड्यांचे मोठे नुकसान झाले.
पावसाळी सिमेंट पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्याने समोर असलेल्या टेम्पोला धडक दिली. टेम्पो कार आणि दोन दुचाकींना धडकल्यानंतर तो ट्रक शाळेच्या गाडीला जाऊन धडकला. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. दरम्यान, या भीषण अपघातानंतर कोंढवा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत वाहतूक सुरळीत केली आहे.
तीन स्वतंत्र मार्गिका
पुण्यातील वाहतूक कोंडींचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कारण, चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल शनिवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाण्याचा मार्ग सुरळीत होणार आहे.
Pune Kondhwa Raod Accident 11 Vehicles Traffic