पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्य निपुणता केंद्र (खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटर) शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत येथे अॅथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे केंद्र आहे. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत शुटिंग, सायकलींग व अॅथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणी दि. ३०/०५/२०२२ ते ३१/०५/२०२२ रोजी घेण्यात येणार आहे. असून त्यासाठी खेळाडूंचे अर्ज मागविण्यात येत आहेत.
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रा अंतर्गत नमुद केल्याप्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्यात अॅथलेटिक्स 18, सायकलींग 14 आणि शुटिंग 24 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. ज्या खेळाडूंना यात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांना संबंधित खेळ बाबी मध्ये खेळाडूंची संबंधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती मार्फत घेऊन गुणानुक्रमे प्रवेश निश्चीत केला जाणार आहे.
खेळनिहाय निवड प्रक्रिया व नियम खालील प्रमाणे आहेत.
१. सायकलींग व अॅथलेटिक्स खेळाचे राज्य स्तरावर प्राविण्यप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तर सहभाग/प्राविण्य प्राप्त खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील.
२. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रांतर्गत प्रवेशाकरिता दर्जात्मक खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी परिशिष्ट-अ नुसार मानके निश्चित केलेली आहेत.
३. खेळाडुंनी दिनांक २३/०५/२०२२ रोजी पर्यंत परिशिष्ट-ब नुसार माहीती अर्ज kiscepune @gmail.com या ई-मेल वर पाठवावेत. सदरच्या अर्जांच्या मागणीसाठी 9421500556 या क्रमांकावर व्हॉट्सअप ने मागणी केल्यास उपलब्ध होईल.
४. शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळूगे-बालेवाडी, पुणे येथे आवश्यकतेनुसार फक्त खेळाडूंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा.
५. चाचणीस येतांना खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत व मुळ प्रत सोबत आणावी.
६. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी.
७. अधिक माहितीसाठी महेश पाटील, क्रीडा अधिकारी – 9421500556 यांचेशी संपर्क साधावा.