पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) येथील विप्स ग्रुपवर छापे टाकले. या छाप्यांचा बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्याशी संबंध असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता ईडी भुसे यांच्याकडे कधी छापे टाकणार असा प्रश्नही राऊत यांनी विचारला आहे.
राऊत यांनी म्हटले आहे की, ईडी ने पुणे नगर परिसरातील vips groups वर आज छापे टाकले. या वित्तीय संस्थेने गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपये जमा केलेआणि हवाला व्यवहारात वळवले. असेच प्रकरण गिरणा सहकारी साखर कारखान्याचे आहे..मंत्री महोदय दादा भुसे यांनी शेतकरी बांधवांकडून १७८ कोटी रुपये गोळा केले. त्याचा हिशोब गायब आहे. मी सीबीआय आणि ईडीकडे रितसर तक्रार केली आहे. त्यांच्यावर छापे कधी पडणार? शेतकऱ्याना हिशोब द्यावाच लागेल, असे राऊत यांनी म्हटले आहे.
Pune ED Raid Connection Minister Dada Bhuse