पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीआरडीओचा संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी हेर झारा हिच्यासोबत झालेल्या मोबाईल चॅटिंगमधील डेटा डिलीट केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पण, त्याने नेमके काय डिलीट केले, याचा अद्याप शोध लागलेला नाही.
डॉ. प्रदीप कुरुलकर याने देशासोबत गद्दारी करत पाकिस्तानी हेर झारा हिच्यासोबत जवळीक वाढवली आणि भारताच्या सुरक्षेसंदर्भातील गुप्त माहिती तिच्यासोबत शेअर केली. खरे तर हा हनी ट्रॅप आहे, हे कुरुलकरसारख्या संरक्षण विभागात काम करणाऱ्या शास्त्रज्ञाला आधीच कळायला हवे होते. पण तो वाहवत गेला आणि त्याने ब्रह्मोस, राफेलसह अनेक गुप्त बाबी तिच्याकडे उघड केल्या. काही गोष्टी प्रत्यक्ष भेटीत सांगणार असल्याचेही त्याने तिला कबुल केले होते. सुदैवाने कुरुलकरची गद्दारी आधीच पकडली गेल्याने भविष्यातील संकट टाळता आले.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या प्रदीप कुरुलकरने पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती पुरवल्याची माहिती समोर आली होती. याच आरोपावरुन त्याला अटक करण्यात आली होती. सध्या प्रदीप कुरुलकर हा एटीएसच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. न्यायालयाने एटीएसला कुरुलकरची व्हाईस लेअर टेस्ट करण्यास परवानगी दिली तर महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या टेस्टदरम्यान त्याने देशाच्या सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती कोणाला सांगितली आहे की नाही? तसेच सांगितली आहे तर किती माहिती दिली आहे, अशा काही गोष्टी समोर येऊ शकतात.
मोबाईल डेटा
आपल्या मोबाईलमध्ये असलेला डेटा डिलीट केला होता. कुरुलकर याच्याकडे असलेला मोबाईलचा डेटा रिट्रीव्ह करण्याचे काम सुरू आहे. त्याचा मोबाईल गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रदीप कुरुलकरने डिलीट केलेल्या डेटामध्ये भारतीय लष्करासंदर्भात तसेच झाराशी केलेल्या चर्चांचे चॅटिंग असण्याची शक्यता आहे.
Pune DRDO Scientist Pradip Kurulkar ATS Investigation
Mobile Data Delete Director Defence Honey Trap