पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संकष्टी चतुर्थीनिमित्त सोमावरी (दि. २१ मार्च) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम तसेच वृद्धाश्रमात प्रसाद म्हणून वाटली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात प्रथमच अशा पद्धतीची आरास मंदिरात केली जाणार आहे. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीच हा उपक्रम करण्यासाठी द्राक्षे देऊ केली होती, मात्र करोनामुळे आलेल्या निर्बंधांमुळे ते शक्य झाले नव्हते. आता हा योग जुळून येत आहे.
द्राक्ष आरासीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे