पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलेद्वारे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे उघडकीस आला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजलेली आहे.
अंजली असे अत्याचार करणाऱ्या महिला आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आरोपी महिलेच्या कोंढवा भागातील परिसरातच राहतो. महिलेच्या नवऱ्याचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. आरोपी अंजली या महिलेने शेजारी राहणाऱ्या या अल्पवयीन मुलाला जबरदस्ती करत पोलिसात जाण्याची धमकी दिली आणि त्याला शरीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडले. महिलेने शरीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ देखील शूट केला. त्यानंतर व्हिडीओची धमकी देत मुलासोबत नंतर चार ते पाच वेळा अनैतिक संबंध करायला भाग पाडले.
या सगळ्या प्रकरणात महिला आरोपीवर पुण्यातील कोंढवा पोलिसात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. पुरुषांद्वारे लैंगिक शोषणाचे प्रकार घडत असतानाच महिलांद्वारेसुद्धा अशा घटना घडताहेत. या प्रकारच्या घटनांमधून समाजातील मानसिक विकृती पुढे येत आहे. पुणे येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी समाजात जनजागृतीपर अभियान राबविण्याची आवश्यकता सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.
पीडित मुलाच्या काकाने दिली वेळोवेळी समज
पीडित मुलाच्या काकाने आरोपी महिलेला वेळोवेळी समज दिली होती. तरीही हा प्रकार सुरूच होता. आरोपी महिलेस अद्याप अटक झालेली नाही. मे २०२१- नोव्हेंबर २०२२ या दरम्यान घडली आहे. मुलाच्या काकाने मोबाईल मधील व्हीडीओ बघितला त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.
Pune Crime Women Sexual Abuse Minor Boy
Kondhwa