पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या मुलाने काही तरी कामधंदा करावा, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते, त्यामुळे ते मुलाला काही चांगल्या गोष्टी सांगत असतात, परंतु आजच्या काळात तरुण मुलांना ही गोष्ट पटत नाही, आणि आई-वडिलांचा राग येतो, त्यातून मग घरात वाद किंवा भांडणे होतात, या वादातूनच एका मुलाने चक्क वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. आणखी भयानक म्हणजे झोपेत असलेल्या वडिलांवर त्याने असा भयानक हल्ला केला, तेव्हा मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे.
मध्यरात्री उठला आणि…
आजच्या काळात कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे की काय असे अनेक घटनांवरून दिसून येते, कारण घराघरात एकमेकांविषयी प्रेम जिव्हाळा राहिलाच नाही बाप मुलाच्या ऐकत नाही आणि मुलगा बापाचे ऐकत नाही, असे दिसून येते त्यातूनच मग काहीतरी विपरीत घटना घडतात. पुणे शहरात मास्टर कॉलनी, टिंगरेनगर भागात राहणाऱ्या लक्ष्मण मंजुळे (वय ५५ ) यांचा त्यांच्याच मुलाने असे खून केला आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ मंजुळे (वय २०) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवनाथचा मामा बाबू दांडेकर (वय ३६ ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुलगा ऐतखाऊ
मयत इसम हा काम धंदा करत होता आणि त्याचा मुलगा मात्र बसून खात होता, त्यामुळे घरात नेहमी तणावाचे वातावरण असे, मुलगा शिवनाथ काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सांगितले होते. याचा त्याला खूप राग आला, मध्यरात्री दीडच्या सुमारास मुलगा शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील कात्रीने छाती आणि पोटावर वार केले. पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची आई झोपेतून जागी झाली. शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. शिवनाथला अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी तपास करत आहेत.
Pune Crime Son Murder Father Killed Police