पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जावई आणि सासर्याचे संबंध हे प्रेमाचे असतील तर मुलीचा संसार सुखाचा होतो असे म्हणतात, काही ठिकाणी तर जावई हा खूप त्रासदायक प्राणी वाटतो. सासरकडे असलेली मंडळी जावयांना दहावा ग्रह असे म्हणतात, वास्तविक जावयाचे सासरवाडीला खूप स्वागत होते. कारण काही ठिकाणी जावयांची दहशत असते, परंतु काही वेळा सासरेबुवा देखील जबर असतात, ते जावयाची डाळ शिजू देत नाही, ते जावायांवर दबाव आणतात, पुणे शहरात असाच एक प्रकार पाहायला मिळाला.
गोठ्यात हात-पाय बांधून डांबले
खानदेश आणि मराठवाड्यात जावयांना मोठा मानसन्मान असतो परंतु एका जावयाच्य मोठा दुर्दैवी प्रसंग घडला. खरे तर पुणे शहरात एक भयानक धक्कादायक घटना घडली, त्यामुळे पुणे शहरात राहणाऱ्या मराठवाड्यात जावई असलेल्या या जावयावर वाईट प्रसंग ओढावला, त्याच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी, यासाठी सासऱ्याने नातेवाइकांच्या मदतीने चक्क जावयाचे अपहरण केले. पुण्यातून त्याला बळजबरीने चारचाकीत बसवत थेट बीडला नेले. तेथील एका गोठ्यात दोरीने हात-पाय बांधून डांबून ठेवले. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद
आजच्या काळ हा स्त्री – पुरुष समानतेचा आहे. त्यामुळे महिला देखील जागृत झालेल्या आहेत, आपल्या नावावर जमीन असावी, असे त्यांना वाटते. काही समजदार पती आपल्या पत्नीच्या नावावर जमीन करून देतात किंवा जमिनीवर पत्नीचे नाव लावतात. मात्र अनेक जण अद्यापही पत्नीला अर्धा वाटा देत नाहीत किंवा त्यांच्या नाव जमीन करत नाहीत परंतु या जावयाला हा प्रकार चांगलाच भोवला. विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे गेमा राठोड, चुलत सासरा रमेश राठोड यांच्यासह नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक राठोड (सर्व रा. शाहूनगर तांडा, गेवराई, बीड) यांनी आडे यांची पत्नी आर्तिका यांच्या नावावर जमीन करून द्यावी, यासाठी आडे यांचे अपहरण केल्याचे म्हटले आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Pune Crime Son in Law Father in Law Kidnapping
Yerwada