पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहे. पुणे शहरही यात मागे नाही. गुन्हेगारी वाढत असताना त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची संख्याही मोठी आहे. अलीकडेच पुण्यात एक विचित्र घटना घडली असून त्याबद्दल जनमानसांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे कृत्य एका मोठ्या बहिणीनेच आपल्या लहान बहिणीसोबत केले असल्याने त्याचे आश्चर्यही व्यक्त होत आहे.
पुण्यात विमान नगर येथे राहणाऱ्या एका २४ वर्षीय मोठ्या बहिणीने आपल्या १८ वर्षाच्या बहिणीसोबत अश्लील कृत्य केले. याची तक्रार स्वतः लहान बहिणीनेच पोलिसांकडे केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. विमान नगर भागात राहणाऱ्या कुटुंबातील ही घटना आहे. मोठ्या बहिणीचे लग्न झालेले असले तरीही ती आपल्या वडिलांकडेच राहते. तर लहान बहीण बाराव्या वर्गात शिकत आहे. ती बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेली असताना मोठी बहीण आतून आली आणि तिने लहान बहिणीच्या शरीरावरून अत्यंत अश्लील भावनेने हात फिरवायला सुरुवात केली. या प्रकाराने लहान बहीण घाबरून गेली. तिने विरोध केला. त्यानंतर थोड्यावेळ वादावादी झाली. पण तरीही मोठी बहीण ऐकायलाच तयार नव्हती. ती जबरदस्ती करायला लागली. यात संतापलेल्या लहान बहीणीने थेट विमानतळ पोलीस ठाणे गाठले. घडलेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
रात्री साडेअकरा वाजता घडला प्रकार
हा प्रकार घडला तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजलेले होते. लहान बहीण घाबरतच पोलीस ठाण्यात आली. तिने आपल्याच बहिणीची तक्रार केली, तेव्हा पोलिसांना आश्चर्य वाटले. पण जेव्हा त्यांना घडलेला प्रकार कळला तेव्हा धक्काच बसला. एखाद्या बहीणीकडून एवढा अश्लील प्रकार घडत असल्याचे त्यांनाही वाईट वाटले.
Pune Crime Sister Sexual Molested Sister