मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील मसाज सेंटरवर पोलिसांची धाड… बिदनिक्कतपणे सुरू होता वेश्या व्यवसाय…

by India Darpan
ऑगस्ट 11, 2023 | 12:07 pm
in राज्य
0
download 89

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्याचे नाव आता गुन्हेगारीमध्ये चांगलेच चर्चेत आहे. गुंडगिरी, लुटपाट, खुन-मारामाऱ्यांनंतर आता मसाज सेंटरच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालविण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांनी सिंहगडाच्या मार्गावरील एका मसाज सेंटरवर धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला आहे.

पुणे शहरातील कोरेगाव पार्कसारख्या भागात यापूर्वी मसाज सेंटरवर छापे टाकले गेले. त्या छाप्यात वेश्याव्यवसायचा प्रकार उघड झाला. आता पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मसाज सेंटरसंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार समोर आला. हवेली पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एकाला अटक केली आहे. पाश्चात्य देशांमधील स्पा सेंटर किंवा मसाज सेंटर नावाचा फंडा होता. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात आला आहे. आता पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही स्पा सेंटर किंवा मसाज सेंटरचे बोर्ड अनेक ठिकाणी लावलेले दिसतात.

या ठिकाणी स्वीडिश, डिप टिश्यू आणि ट्रिगर प्वाइंट असे वेगवेगळे पर्याय देऊन मसाज केली जाते. यामाध्यमातून आता ग्राहकांना शोधून वेश्याव्यवसाय चालवला जात आहे. पुणे शहरात काही मसाज सेंटर निवासी संकुलातही थाटले गेले आहे. यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. सिंहगडाच्या मार्गावर मसाज सेंटर चालवणारा शैलेश सर्जेराव देडे याला पोलिसांनी अटक केली आहे. देडे याने सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळ स्पर्श मसाज सेंटर सुरु केले होते. त्यामध्ये वेश्या व्यवसाय सुरु केला. यासंदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना मसाज सेंटरमध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या आहेत. या प्रकरणी देडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे सुरक्षित नाही?
एकेकाळी पुण्याचा उल्लेख सर्वांत सुरक्षित शहर म्हणून व्हायचा. मात्र आता पुण्याची ओळख गुन्हेगारीसाठी होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी भर दिवसा एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला होता. अर्थात एकाने मध्ये येऊन जीव वाचवला. याशिवाय खुन, दरोडे सातत्याने होत आहेत. आता मसाज पार्लरच्या माध्यमातून वेश्या व्यवसायाचा मार्ग शोधला गेला आहे.

pune crime sinhagad road massage center Sex Racket
Police Arrest Spa

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मणिपूरमध्ये आणखी एक भयानक प्रकार…. महिलेला नग्न करून सामुहिक बलात्कार… पीडिता म्हणाली…

Next Post

‘या’ महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली… ‘ते’ प्रकरण अंगलट येणार

India Darpan

Next Post
F2hEYncWQAA3sDh scaled e1691740469209

'या' महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली... 'ते' प्रकरण अंगलट येणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011