पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सला त्यांच्या लेखापालांनीच एक कोटीने चुना लावला आणि नोकरी सोडून दिली. हा प्रकार दोघांनीही नोकरी सोडल्यानंतर लक्षात आला. दरम्यान सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत प्रकार घडत असताना रांका ज्वेलर्सच्या व्यवस्थापनाला त्याची खबरही नव्हती.
रांका ज्वेलर्सच्या रविवार पेठ शाखेत हा प्रकार घडला. या घटनेची पोलीस तक्रार झाल्यानंतर लेखापाल अमन ओझा आणि देव नारायण दुबे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांका ज्वेलर्समधील या घटनेमुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्याने इतर व्यापाऱ्यांच्या मनातही धडकी भरली आहे. रांका ज्वेलर्स पेढीतील ही फसवणुक सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल होते. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर व्यवस्थापकांच्या नावाने बनावट सह्या केल्या. अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर धनादेश जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले. दोघांनी एक कोटीहून अधिक रक्कम काढली. त्यानंतर ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने नोकरीही सोडून दिली.
पोलीस तक्रार
व्यवस्थापकांना काहीतरी गडबड झाली असल्याची शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली असता धनादेशावर देशपांडे यांची बनावट स्वाक्षरी असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील हिशोब तपासला तेव्हा बनावट सही करून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी पोलीस तक्रार केली.
३०० कोटींनी फसणुक
पुण्यातील अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट कंपनीचे मालक सेलवाकुमार नडार याने २०० कर्जदारांची गुंतवणुकीचे आमिष देऊन ३०० कोटींनी फसवणुक केली आहे. १६ लोकांनी एकत्र येऊन पोलिसांत तक्रार केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. यामध्ये अनेक लोकांना मोठा गंडा बसला असण्याची शक्यता आहे.
Pune Crime Ranka Jewellers Cheating Accountant Fraud 1 Crore