पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुण्यात रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे करणा-या गौरव आहुजाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा माफी मागतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. मी चुकलो, मला एक संधी द्या असं म्हणत गौरव आहुजा माफी मागताना दिसत आहे.
तर त्याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेचा संताप व्यक्त केला आहे. गौरव माझा मुलगा असल्याची लाच वाटते, त्याने सिग्नलवर लघुशंका नाही केली तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे.
नेमकं काय घडलं
पुण्यातील शास्त्रीनगर भर चौकात एका मद्यधुंद तरुणाने BMW कार उभी करु अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाब विचारायला गेलेल्या व्यक्ती समोर देखील या तरुणांनी अश्लिल कृत्य केले. त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला. जागतिक महिला दिनाच्या सकाळीच घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
या घटनेंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवणं, रस्त्यावर अशोभनीय कृत्य करणं, त्यानंतर विरोध करणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव करणं – हा गुन्हा फक्त निबंध लिहून घेऊन पुन्हा पोलिसांनी माफ करू नये. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे! महिलांच्या सुरक्षेबाबत गाजावाजा करणाऱ्या सरकारने यावर तत्काळ पाऊल उचललं पाहिजे. दिवसेंदिवस पुण्यासारख्या शहरात महिलांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे म्हटले.